Ad will apear here
Next
शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन
सोलापूर : येथील खादिमाने उर्दू फोरम संचलित शहीद कुर्बान हुसेन या शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन केंद्राचा उद्घाटन सोहळा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. हे केंद्र उर्दू माध्यमाचे आहे. या वेळी बिदरच्या शाहीन शिक्षण समूहाचे सेक्रेटरी डॉ. अब्दुल कदिर अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. शफी चोबदार यांनी दिली आहे.

या सोहळ्यास सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी, मौलाना इब्राहिम कासमी, ‘अहले हदीस जमात’चे अध्यक्ष हाजी मुख्तार हुमनाबादकर, ॲड. जैद नईम शेख, फैजइनामदार, माजी आमदार युन्नूस शेख, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, माजी महापौर आरीफ शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रफिक हत्तुरे, ‘एमआयएम’चे नगरसेवक रियाज खरादी, मेजर युसूफ शेख आदी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळा :
दिवस : शनिवार, २९ जुलै २०१७
वेळ : सायंकाळी साडेसात वाजता
स्थळ : नईम शेख साहित्य व सांस्कृतिक केंद्र, बारा इमाम चौक, सोलापूर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZADBE
Similar Posts
श्रीनिवास दायमा यांचा वाढदिवस उत्साहात सोरेगाव (जि. सोलापूर) : येथील गोशाला येथे सोलापूर भाजपचे कोषाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महापौर शोभा बनशेट्टी, राज्य बँकेचे प्रशासक अविनाश महागावकर, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निम्बरगी, नगरसेविका मेनका राठोड, सरचिटणीस गणपा साहेब, परिवहन सभापती देदीप्य वडापुरकर, पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते
‘मुलांच्या मनातील भीती दूर झाली तर गळतीचे प्रमाण कमी होईल’ सोलापूर : ‘आज शिक्षण क्षेत्रात होत असलेली गळती थांबली पाहिजे आणि खादिमाने उर्दू फोरमने या महत्त्वाच्या कामासाठी पुढाकार घेतला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या कामी महापालिकेतर्फे जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे,’ असे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले. खादिमाने उर्दू फोरमतर्फे आयोजित शहीद कुर्बानहुसेन
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language